Uncategorized

प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार दर्शना रमेश पंडित प्रचारात अग्रेसर..

 

दाऊ गाडगेवाड / हिमायतनगर

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ हिमायतनगर चा सध्या प्रचाराचा वेग वाढला असून, काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार दर्शना रमेश पंडित यांच्या उत्कृष्ट आणि विकास प्रिय नियोजनामुळे प्रचारांमध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे.

दैनिक लोकशक्तीचे विभागीय संपादक रमेश पंडित यांच्या सौभाग्यवती असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे सर्व समाजाची भक्कम साथ मिळणार यात शंका नाही.

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे रमेश पंडित यांच्या लोकप्रियतेमुळे सर्व मतदार त्यांच्या पारड्यात मतदान रुपी आशीर्वाद देऊन सहकार्य करतील अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण १७ उमेदवारांची फळी ही नवी असून युवा नेतृत्वांना संधी दिल्यामुळे हिमायतनगर मध्ये सर्वत्र काँग्रेसचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रचाराचा धूरळा सुरू झाला असून काँग्रेस उमेदवारांचा प्रचार सध्या तरी मोठ्या प्रमाणात लोकप्रियतेचा कळस गाठताना दिसत आहे. तसेच थेट जनतेतून निवडल्या जाणारे नगराध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे उमेदवार शेख रफिक शेख महेबूब यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे नगराध्यक्षपदावर देखील काँग्रेसचा झेंडा फडकणार यात शंका नाही. जनतेची साथ आणि विकासाच्या जोरावर सध्या काँग्रेस पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात सध्यातरी यशस्वी होत आहे. परंतु निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांनी सद्यस्थितीत आघाडी घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button