Uncategorized

पोटा-कामारी जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीकडून सुनिल पतंगे प्रबळ दावेदार

 

विष्णु जाधव हिमायतनगर प्रतिनिधी /-

 

नगरपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली असून लवकरच जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद निवडणुक लढविणाऱ्या इच्छुकांची धावपळ होताना दिसून येत आहे. हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे यांनी निवडणुक लढविण्याची तयारी केली असून महाविकास आघाडीकडून ते पोटा -कामारी जिल्हा परिषद गटातून प्रबळ दावेदार असल्याचे मतदारांमध्ये बोलल्या जात आहे.

सुनिल पतंगे हे स्वर्गीय लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नागोराव पतंगे यांचे चिरंजीव आहेत. स्वर्गीय नागोराव पतंगे यांनी निस्वार्थपणे राजकारणामध्ये जनतेची कामे केली आहेत. त्यांनी कधीच कोणत्याही पदाची अपेक्षा बाळगली नाही. राजकारण करत असताना समाजकार्य कसे करायचे याचे उत्तम उदाहरण स्वर्गीय नागोराव पतंगे. त्यांचा जीवनकाळ बघीतल्यास लक्षात येईल. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन सुनिल पतंगे यांनी राजकारणात पाऊल ठेवले आहे. सुनिल पतंगे हे उच्च शिक्षीत, विद्याविभुषीत तरूण, तडफदार नेतृत्व विकसीत होत आहे. सामाजिक जान आणि जनसेवेच्या माध्यमातून पोटा कामारी परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. ते मोठ्या जोमाने मतदार संघात प्रचार करत आहेत.  त्यांच्या इंट्रीने राजकीय वातावरण तापू लागले आहे. जन सामान्यांच्या समस्या घेऊन शासन दरबारी आवाज उठविणारे सुनिल पतंगे हे गेली अनेक वर्षे हिमायतनगर तालुक्यात जनतेसाठी कार्य करत आहेत.  त्यांच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी खरा लोकप्रतिनिधी हवा अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, या पार्श्वभूमीवर ते जनतेचे प्रतिनिधी म्हणून पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, लोकप्रतिनिधी हा जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारा लोकप्रतिनिधी असावा. त्याच बरोबर जनतेला शासनाच्या योजना कशा राबविल्या जातात, त्या योजना नागरीकांना मिळवून देणारा प्रतिनिधी असायला हवा. तसेच नागरीकांना दळणवपळणासाठी चांगले रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांसाठी लढणारा लोकप्रतिनिधी पोटा कामारी गटातील मतदारांनी निवडला तर त्यांना हवा असणारा त्यांच्या भागाचा विकास साधता येईल.  सुनिल पतंगे उच्चशिक्षीत, सर्व सामान्य जनतेशी नाळ जोडलेला नेता असल्याने त्यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button