नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दर्शना रमेश पंडित यांच्याकडून विकासकामांचा श्रीगणेशा

विष्णु जाधव / हिमायतनगर
नुकताच हिमायतनगर नगरपंचायतीचा धुरळा उडाला असून प्रभाग क्र. ७ मधून बहुमताने निवडून आलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका सौ दर्शना रमेश पंडित यांनी आपल्या प्रभागामध्ये विकास कामांचा श्रीगणेशा केला आहे. मागील अनेक वर्षापासून प्रभाग क्रं. ७ मधील नागरीकांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत होता. येणाऱ्या काळात येथील नागरीकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये याची दक्षता त्यांनी घेतली आहे. नागरीकांची समस्या समजून घेऊन नगरसेविका पदाचा पदभार स्विकारण्यापुर्वीच दोन बोअरवेल पाडले असून त्या दोन बोअरवेलला भरपूर पाणी लागले येथील नागरीकांची तहान भागली आहे. या कामामुळे नगरसेविका सौ. दर्शना रमेश पंडित यांनी दिलेले वचन पुर्ण केल्याचे नागरीक बोलत आहेत. तसेच त्यांच्या कामाचे कौतुकही केल्या जात आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रभागातील स्वच्छता देखिल करण्यास सुरूवात केली आहे. येणाऱ्या भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनापर्यंत प्रभाग स्वच्छ होईल असा शब्द त्यांनी नागरीकांना दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत अशोक हनवते, मोहन हळदे, दलितानंद हनवते, बाळा कदम, प्रविण हनवते, मनोहर कांबळे, राजरतन हळदे, मारी हनवते, पप्पू जाधव, सोनू हनवते, सय्यद मुस्तफा, अक्षय जंगमे, परमेश्वर हळदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



