Uncategorized

ओमसाई  प्रिंटर्सचे राजुअण्णा मामुलवार यांच्या हस्ते उद्घाटन 

 

विष्णु जाधव / हिमायतनगर

 

भोई समाज हा अतिशय मागासलेला समाज असून या समाजातील लोकांचा मुळ व्यवसाय मासेमारी असल्याने नदी, तलावाच्या काठावरच आपले जीवन जगत असतात. शिक्षणातही बराच मागास आहे. उद्योगापासून तर कोसो दूर आहे. एकविसाव शतक हे भरभराटीचे व उद्योगांचे म्हणून उदयास आले आहे. या युगात अनेक समाजातील नवतरूण युवक पारंपारीक व्यवसायाबरोबरच इतर उद्योग क्षेत्रातही नावलौकीक मिळवत आहेत. अशीच कहाणी भोई समाजातील डोल्हारी या छोट्याशा गावातील नवतरूण साहेबराव किसनराव अष्टकर यांची आहे. शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाला प्राधान्य दिले. ओमसाई ऑफसेट प्रिंटर्स या व्यवसायात हिमायतनगर शहरात छोटेशे दुकान चालू केले. त्या छोट्याशा दुकानाचे आज त्यांच्या ओमसाई ऑफसेट प्रिंटर्सने हिमायतनगर तालुकाच नाही तर नांदेड जिल्ह्यात नावलौकीक मिळवले आहे. आज त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून डिजिटल बॅनर प्रिंटिंग चालू केले आहे. सोबतच कलर प्रिंटर, लग्न पत्रिका छापने, बायंडिंग, डिझायनिंग करणे इत्यादी. आज दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी भोई समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजुअण्णा मामुलवार याच्या हस्ते त्यांच्या ओमसाई प्रिंटर्सचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी भोई समाज महासंघाचे अहमदपूर येथील संकल्प निवासी गुरूकुलचे संचालक आर. डी. मुसळेसर , राजू वालगोटवाड, विजय उट्टलवाड, गणपत पांडलवाड किनीकर, सतोष निलावार, माधव वदतवाड वाघीकर, विनायक वटटवाड, माधवराव बावने, ऋषिकेश जिलेवार, पत्रकार दाऊ गाडगेवाड, सुरेश टोकलवाड, संतोष टोकलवाड वडगावकरसह अनेक भोई समाज महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

भोई समाजातील नव तरूणांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकावे- राजुअण्णा मामुलवार

भोई समाजातील समाज बांधवांनी मासेमारी हा पारंपारीक व्यवसाय असला तरी नव तरूणांनी इतर उद्योगाकडे वळावे. नविन उद्योगामध्ये पाऊल टाकले तरच आपल्या परिवारा बरोबर समाजाचीही प्रगती साधता येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button