स्वखर्चातून राज गाडेकर यांनी चार महीण्यापासून बंद असलेला रस्ता केला मोकळा
मौजे करंजी येथील ग्रामस्तांकडून होत आहे त्यांच्या कामाचे कौतूक

विष्णु जाधव / हिमायतनगर
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये, ग्रामसेवक, सरपंच यांच्या कामाचा सावळा गोंधळ चालू असून अनेक ग्रामपंचायतीविरूद्ध पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तक्रारींचा सपाटा चालू आहे. नागरीकांना त्यांच्या गोंधळामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून अशीच एक घटना तालुक्यातील करंजी या गावी घडली आहे. झाले असे की, गावातील एक रस्ता पावसाळ्यातील पाण्यामुळे बंद झाला होता. त्या रस्त्यावरून दुचाकी वाहने तर जातच नव्हते पण नागरीकांना पायी सुद्धा अवघड झाले होते.हा रस्ता नगरीकांना जाण्यासाठी सोईचा करून द्यावा अशी विनवनी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे अनेक वेळा केली होती. परंतू गावचे प्रथम नागरीक सरपंच व ग्रामसेवक यांनी गावकऱ्यांचे म्हणने ऐकले नाही व रस्त्याची समस्या सोडवली नाही. ही माहीती सामाजिक कार्यकर्ते राज गाडेकर यांच्या कानावर आल्याने त्यांनी स्वत : पुढाकार घेऊन स्वखर्चाने तो रस्ता जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यातील चिखल काढून नागरीकांना मोकळा करून दिला. राज गाडेकर यांच्या या कार्यामुळे गावात सर्वत्र कौतुक केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते राज गाडेकर हे वेळोवेळी गावातील बांधवांसाठी हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेकदा फक्त बोलून नाहीतर आपल्या कामातून आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडली आहे.गावकऱ्यांसाठीच नव्हे तर संबंध तालुक्यात ते एक युवा नेतृत्व म्हणून सर्वपरिचित आहेत.शोकांतिका ही आहे की या युवा सामाजिक कार्यकर्त्याला गावात नेतृत्व करण्याची संधी गावकऱ्यांनी दिली नाही. तरीही ते आपल्या कार्यातून गावकऱ्यांची सेवा करण्याची कोणतीही संधी दवडत नाहीत.
या घटनेतून गावच्या सरपंचांचा निष्क्रियपणा प्रकर्षाने दिसून येत आहे.गावकऱ्यांच्या समस्या सोडवणे व त्यांना पायाभूत सोयी सुविधा पुरविणे ही कामे सरपंच तथा ग्रामसेवक करत नसल्याच्या तक्रारीही अनेक गावकरी करत असताना दिसून येत आहे.या बाबीकडे गटविकास अधिकारी हे कोणत्या दृष्टी ने पाहतील हे आता येणारा काळच सांगेन.



