विजय वाठोरे यांना ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार ” जाहीर
विष्णु जाधव / हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील युवा पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित असलेले मौजे सरसम (बु) येथील साहित्यिक,पत्रकार विजय नारायण वाठोरे यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद यांच्यातर्फे दिला जाणारा ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार २०२६ ” जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे निवडपत्र अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी त्यांना दिले आहे.
हिमायतनगर तालुक्यामध्ये धडाडीने अन निडरपणे सातत्याने गोर गरीब,वंचित शोषितांचे प्रश्न, समस्या आपल्या लेखणीतून प्रखरपणे मांडणारे तसेच जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा आवाज बुलंद करत प्रशासनावर जबरी पकड ठेवून अनेकांना पत्रकारिता क्षेत्रातून मदत करणारा पत्रकार,समाजसेवक म्हणून विजय नारायण वाठोरे यांची सबंध हिमायतनगर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख आहे.आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित आहेत. ते पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी संस्थापित केलील्या ” दलित पॅंथर ” या लढाऊ,विद्रोही संघटनेचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत.यापूर्वीही त्यांनी अनेक पत्रकारिता, सामाजिक संघटनांचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तथा विविध पदभार सांभाळलेला आहे. सध्या ते दैनिक लोकशक्तीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी असून नमस्ते हिमायतनगर, महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज,हिमायतनगर डायरी यासारख्या सोशल मीडिया चॅनलचीही ते संपादक म्हणून कार्य करत आहेत.
पत्रकार विजय वाठोरे यांना यापूर्वीही पत्रकार क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२५, संवेदना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार २०२५ हे पुरस्कार मिळालेले आहेत. हा पुरस्कार विजय वाठोरे यांना रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय भावसार चौक नांदेड येथे पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकार विजय वाठोरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण गोटे, दलित पॅंथरच्या प्रदेशाध्यक्ष प्रियंका बागुल,वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार गंगाधर वाघमारे,दैनिक लोकशक्तीचे मुख्य संपादक विजयजी लेंडाळ, कार्यकारी संपादक इमरान शेख,दैनिक लोकशक्तीचे मराठवाडा विभागीय संपादक तथा नगरसेवक प्रतिनिधी रमेश पंडित,सा. वृत्त वारसदार चे मुख्य संपादक त्रिरत्नकुमार भवरे,दै विर शिरोमणी चे मुख्य संपादक शंकरसिंह ठाकूर, दै नंदगिरीचा कानोसा चे मुख्य संपादक मारोती शिकारे,पत्रकार दाऊ गाडगेवाड,विष्णू जाधव,दिलीप शिंदे,नागेश शिंदे,माधव काईतवाड,गंगाधर गायकवाड,सोपान बोंपीलवार,मारोती वाडेकर,ज्ञानेश्वर पंदलवाड,नागोराव शिंदे,अंगद सुरोशे,अल्ताफ शेख,पाशा खतीब,विनोद चंदनवार,लिंगोजी कदम,प्रभू कदम,सेवानिवृत्त मुख्याध्यापक संभाजी वाठोरे, शिक्षिका बेबीनंदा बाबासाहेब सोनवणे,मुंबई उच्चन्यायालयाचे लिपिक सुमेध वाठोरे,आस्था क्लिनिक पासदगाव चे डॉ.संदेश वाठोरे,वडील नारायण चोखाजी वाठोरे,आई कालिंदा वाठोरे,राजरतन वाठोरे,संघप्रिया कवडे,लंकेश चंद्रमणी वाठोरे,आचल वाठोरे,प्रतीक्षा बगाटे,दक्ष कवडे, खुशी कवडे,राज गाडेकर, विजय धोबे,गझलकार चंद्रकांत कदम यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.



