Uncategorized

वार्ड क्रमांक १७ मध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार – शेख मुदसिर

 

 

हिमायतनगर / विष्णु जाधव

 

हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटकडून वार्ड क्रमांक १७ मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युवा कार्यकर्ते शेख मुदसिर यांनी आपल्या जोरदार निवडणूक लढाईची घोषणा केली आहे.

शेख मुदसिर हे हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित वकील व पत्रकार शेख मुजम्मील शेख नजीर यांचे लहान बंधू असून समाजात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सक्रिय योगदान देत आहेत. उमेदवारीची अधिकृत छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकारांशी आणि समाजबांधवांशी संवाद साधताना शेख मुदसिर म्हणाले, ही निवडणूक मी राजकीय नेता बनण्यासाठी नव्हे तर वार्ड क्रमांक १७ च्या सर्वांगीण विकासासाठी लढवत आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असून त्या दूर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. ते पुढे म्हणाले की, त्यांचे बालपण वार्ड क्रमांक १७ मध्येच गेले असल्याने तेथील नागरिकांच्या अडचणी, गरजा आणि विकासाचे मुद्दे स्वतः अनुभवले आहेत. हाच विश्वास आणि जबाबदारी मनात ठेवून त्यांनी या वार्डातून उमेदवारी स्विकारल्याचे त्यांनी सांगितले.

वार्ड क्रमांक १७ च्या सर्वांगीण विकासासाठी, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा आणि युवकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचे माझे उद्दिष्ट आहे असे शेख मुदसिर यांनी स्पष्ट केले.

शेख मुदसिर यांच्या उमेदवारीनंतर वार्ड क्रमांक १७ मधील निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button