Uncategorized

राजषी शाहू महाराज साहित्यिक व वयोवृद्ध कलावंत मानधन निवड समिती गठित न केल्यामुळे कलावंत मानधनापासून वंचित               

 

 

विष्णु जाधव/ हिमायतनगर

 

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुलजी सावे यांनी राजश्री शाहू महाराज मान्यवर साहित्यिक व वयोवृद्ध कलावंत मानधन निवड समिती गठित न केल्यामुळे तीन वर्षापासून वयोवृद्ध कलावंतांनी जिल्हा परिषद पंचायत विभाग नांदेड कार्यालयाकडे प्रस्ताव दिले असून ते प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कलावंत मानधनापासून वंचित आहेत.

बहुजन टायगर युवा फोर्स चे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर व कलावंतांनी अनेक वेळा जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन आंदोलन केले. पालकमंत्री ना. अतुलजी सावे यांनी लवकरात लवकर मानधन निवड समिती गठीत करावी म्हणून निवेदनही दिली, परंतु अद्यापही पालकमंत्री महोदयांनी याबाबतची दखल घेतलेली नाही. पालकमंत्री महोदयांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या हंगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पूर्वी कलावंताची निवड समिती गठीत करावी अशी नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंताची एक मुखी मागणी आहे. अनेक कलावंत  आपणास मानधन मिळेल या आशे पोटी जिल्हा परिषद कार्यालयाकडे चकरा मारत आहेत. हाडाच्या उपेक्षित असलेल्या कलावंतांनी आपण शासनाच्या मानधनाचे मानकरी होऊ अशी अपेक्षा बाळगून अनेक कलावंतांचा शेवटी थकून अपेक्षाभंग झाल्यामुळे निराशा झाली आहे. अशा निराश झालेल्या कलावंतांना न्याय मिळेल काय हा प्रश्न आता डोळ्यासमोर उभा आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील अनेक दुसऱ्या समित्या गठीत झाल्या परंतु राजश्री शाहू महाराज साहित्यिक वयोवृद्ध कलावंत समिती गठीत केली नसल्यामुळे कलावंत मात्र मानधनापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. कला ही पैशाने विकत घेता येत नाही निसर्गाने दिलेली कलावंतांना देणगी आहे. या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनकार समाजातील घटकांना ते न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात. आपली संस्कृती टिकवून ठेवतात अशा कलावंतांचा, साहित्यिकांचा  आयुष्याच्या उतरत्या काळामध्ये शासनाकडून त्यांना सन्मानाने मानधन मिळावी ही अपेक्षा उराशी बाळगून आहेत. अशा उपेक्षित अंतकरणांच्या कलावंतांना न्याय मिळावा अशी ओरड कलावंतांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.

नांदेड जिल्हा राजश्री शाहू महाराज मान्यवर साहित्यिक व वयोवृद्ध कलावंत मानधन निवड समिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अंतुलजी सावे साहेब यांनी गठीत नाही केल्यास या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब नांदेड व सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांना वयोवृद्धांच्या स्वाक्षरीनिशी एक निवेदन देऊन जिल्हा परिषद कार्यालय नांदेड समोर फेब्रुवारी महिन्यात भजन आंदोलन वयोवृद्ध कलावंत करणार असल्याची कलावंतात जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button