Uncategorized

जिल्हा परिषद शाळा पवना येथे शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड उत्साहात संपन्न

 

दाऊ गाडगेवाड / हिमायतनगर

 

जिल्हा परिषद शाळा पवना येथे शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड मोठ्या उत्साहात, पारदर्शक वातावरणात आणि सर्वानुमते पार पडली. या निवडीनंतर शाळा परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

या निवडीत अध्यक्षपदासाठी गणेश परमेश्वर गोसलवाड तर उपाध्यक्षपदासाठी संभाजी विठ्ठल राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांचा फुलांच्या हारांनी, पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करून सत्कार करण्यात आला.

 

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच प्रतिनिधी, पालकवर्ग, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड प्रक्रिया अत्यंत आनंदी, पारदर्शक आणि सुसंवादी वातावरणात पार पडली.

 

नवीन अध्यक्ष गणेश गोसलवाड यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने नवनवीनउपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.

उपाध्यक्ष संभाजी राऊत यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ शाळा परिसर आणि आधुनिक शैक्षणिक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समिती व शिक्षकांसह संयुक्तपणे प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

 

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी गावातील सर्व घटकांनी शाळेच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षकांनी केले, तर आभार प्रदर्शन समिती सदस्यांनी मान्यवरांचे आभार मानून केले.

संपूर्ण कार्यक्रमात आनंदी वातावरण, उत्साह आणि सहकार्याची भावना पाहायला मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button